बहुचर्चित सिटी ऑफ ड्रीम्स २ ही सिरीज नुकतीच प्रदर्शित झाली.अफलातून अभिनय आणि उत्तम कथानक यांच्या जोरावर या सीरिजमधील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. दुसऱ्या सिझन मध्ये आदिनाथ कोठारेची सरप्राईज एण्ट्री प्रेक्षकांना आश्चर्यचकित करून गेली.
सिटी ऑफ ड्रीम्स’च्या दुसऱ्या सिझनमधील महेश आरवले ही व्यक्तीरेखा सध्या बहुचर्चित ठरत असून विशेष लोकप्रिय होताना दिसत आहे. या भूमिकेच्या माध्यमातून अभिनेता आदिनाथ कोठारे या सीरिजमध्ये झळकला आहे. विशेष म्हणजे ‘सिटी ऑफ ड्रीम्स २’च्या पोस्टर, ट्रेलर वा टीझरमध्ये कुठेही महेश आरवलेची भूमिका कोण साकारणार हे स्पष्ट करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे या भूमिकेविषयी प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, ही सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर या भूमिकेवरील पडदा दूर झाला आणि आदिनाथ प्रेक्षकांच्या भेटीला आला.
“सिटी ऑफ ड्रीम्समधील महेश आरवले ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांसाठी खास गुपित म्हणून ठेवली होती. मात्र, हे गुपित उघडल्यानंतर प्रेक्षकांनी त्यावर भरभरून प्रेम केलं. अनेकांचे अभिनंदनाचे फोन, मेसेज येत होते. सोशल मीडियावरही माझ्या भूमिकेचं भरभरुन कौतुक करण्यात आलं. त्यामुळे माझ्यावर प्रेम केल्यामुळे सगळ्यांचेच मनापासून आभार. प्रेक्षक करत असलेल्या याच प्रेमामुळे काम करण्याची नवी ऊर्जा मिळते”, असं आदिनाथ म्हणाला.
Credits and Copyrights – lokshahinews.com