मुंबई : कोरोनामुळे राज्यासह देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. त्यामुळे महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावल्याने राज्यातील शाळांपाठोपाठ महाविद्यालये आणि विद्यापीठे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे.

आजपासून राज्यभरातील कॉलेज सुरु होत आहेत याशिवाय राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये आजपासून सुरू होणार आहे. 20 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरु करण्याबाबत राज्य सरकारनं हिरवा कंदील दिला आहे.

काय आहेत नियम?
- कोरोना संसर्ग कमी झालेल्या ठिकाणी 50 टक्केपेक्षा जास्त क्षमतेने महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- यात महत्वाची सूचना अशी की विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेलं असणे आवश्यक आहे. अशा विद्यार्थ्यांना प्राधान्याने महाविद्यात बोलावलं पाहिजे.
- कोरोना लसीकरण पूर्ण झालेले नसतील तर विद्यापीठ, महाविद्यालयाने पुढाकार घेऊन जिथल्या स्थानिक प्रशासनाशी चर्चा करुन विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय परिसरातच लसीकरण राबवले पाहिजे.
- ज्या परिसरात कोरोना वाढण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी स्थानिक प्रसासनाशी चर्चा करुनच कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घ्यायचा आहे.
- तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थिती पाहून नियमावली बदलण्याचा अधिकारी आम्ही विद्यापीठ, महाविद्यालयांना दिलं आहे.
- परिस्थितीनुसार प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळी नियमावली तयार करायची आहे.
- जे विद्यार्थी प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहू शकत नाही. अशा विद्यार्थ्यांची ऑनलाईन सोय महाविद्यालयांनी करुन द्यायची आहे.
- टप्प्याटप्प्याने वसतीगृह सुरू करण्यास आम्ही परवानगी देण्यात आली आहे.
- शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 100 टक्के लसीकरण करण्याच्या सूचना आम्ही विद्यापीठ आणि महाविद्यालयांना दिली आहे.
- ज्यांनी दोन डोस घेतले आहेत अशा विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि पालकांनी विनंती आहे की कोरोना नियम पाळणे बंधनकारक आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.