7 वर्षांच्या लेकीला संपवून आईनंही आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधील विनयनगरमध्ये उघडकीस आला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पतीचा सहन न होणारा विरह आणि 7 वर्षांच्या चिमुरडी वडिलांची सतत आठवण काढत असल्यानं मुलीनं वडील जिकडे गेले आपणही तिकडे जाऊ असं चिमुकलीला सांगितलं.commits suicide
आत्महत्येपुर्वी सुजाता तेजाळे यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यात म्हंटले आहे, “मी सुजाता प्रवीण तेजाळे, मी माझ्या स्वतःच्या इच्छेने आयुष्य संपवत आहे. कारण की, माझे पती प्रवीण पंडित तेजाळे हे अचानक कोरोनाने गेले. तेव्हापासून माझे आयुष्य संपल्यासारखे आहे. आयुष्य खूप मोठं असतं पण एकट्याने राहण्यात अर्थच नाही. ना कुणाशी बोलण्याची इच्छा ना कुणाला भेटण्याची इच्छा होते. परंतु इतके दिवस फक्त मुलीसाठी कसेतरी आयुष्य काढत होते. सध्या ती खूप लहान आहे, पुढे तिचे देखील आयुष्य आहे. परंतु तिलाही पप्पांची सतत आठवण येते. पप्पा देवाघरी गेले आहे हे, मी तिला काही दिवसांपूर्वी समजावून सांगितलं, काही दिवस ती शांत राहिली. आता मात्र पुन्हा ती सतत पप्पा कधी येणार हा एकच प्रश्न मला विचारत राहते, मी पूजा केली तरीही पप्पा काय येत नाही.
या तिच्या प्रश्नाला मी काय उत्तर देऊ , आज सकाळी झोपेतून उठल्यावर अचानक ती मला म्हणाली, ‘मम्मी, पप्पा नाही तर तू पण दुःखी राहते मी पण sad राहते, आपण पप्पांकडे जाऊयात’ तिच्या या प्रश्नावर मी आज खूप विचार केला. जर पुढे मलाच काही झालं तर तिचं काय होईल? तिला सोडून जाणं शक्य नाही. आमच्या दोघींच्या आयुष्यात आता सुख नाही. आयुष्यात जगण्यासाठी पैसा सर्व काही नसतो, असं आयुष्य काढणं खूप कठीण आहे. जसा जन्म देताना त्रास झाला तसं थोडं मन घट्ट करुन हे करणार आहे. आणि हे करताना तिला सांगणार आहे की, आपण आता पप्पांकडे चाललो आहोत. अशी समजूत काढत आमचे आयुष्य मी आता संपवत आहे. ह्यात मी जन्म देती वैरीण नाही. ह्या जगात खूप वाईट आणि विचित्र लोक आहेत. म्हणून हा असाही बराच विचार करून तिला जसा जन्म दिला तसंच तिची काळजी करून तिलासोबत घेऊन चालले आहे. बापाशिवाय अर्थ नाही आणि नवऱ्याशिवाय ही अर्थ नाही’
त्यानंतर आई सुनीता तेजाळे यांनी अनया तेजाळे या आपल्या 7 वर्षांच्या मुलीला संपवून गळफास घेऊन आत्महत्या केली. असा पोलिसांच्या हाती लागलेल्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख आहे. मी जन्मदात्रीचं, वैरीण नाही. मन घट्ट करून लेकीला संपवते, असा उल्लेख देखील या सुसाईड नोटमध्ये आहे.commits suicide
Credits and copyrights – nashikonweb.com