कोरोना काळात ऑनलाईन फ्रॉड सायबर क्राइमच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या घटनांबद्दल बँकांकडून, सरकारकडूनही याबाबत जनतेला इशारा देण्यात आला आहे. आता टेलिकॉम कंपनी वोडाफोन – आयडियाकडूनही युजर्सला ऑनलाईन फ्रॉडबाबत अलर्ट करण्यात आलं आहे.
या स्कॅममध्ये फ्रॉड करणारे स्कॅमर्स Vodafone-Idea ग्राहकांची KYC अपडेट करण्याच्या नावाखाली फसवणूक करत आहेत. फ्रॉड कॉल किंवा SMS द्वारे ग्राहकांना या फसवणुकीच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याआधी Airtel, Jio नेही आपल्या ग्राहकांना फ्रॉडबाबत अलर्ट केलं होतं. आता वोडाफोन-आयडियाकडूनही आपल्या ग्राहकांना सतर्क राहण्याचं सांगण्यात आलं आहे.
फेक कॉल किंवा SMS द्वारे ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. यात ग्राहकांना KYC अपडेट करण्यासाठी सांगितलं जातं. KYC अपडेट न केल्यास, SIM कार्ड ब्लॉक केलं जाईल, असं त्या मेसेजमध्ये सांगितलं जातं. KYC डिटेल्स अपडेट नसल्याने सिम कार्ड ब्लॉक केलं जाईल असं सांगितलं जातं.
तुमच्याकडे Contactless क्रेडिट किंवा डेबिट कार्ड आहे का? अशी बाळगा सावधगिरी ग्राहकांची माहिती अपडेट नसल्याच्या नावाखाली खासगी डिटेल्स मागितले जातात. ग्राहक देखील आपलं सिम कार्ड ब्लॉक होईल या भीतीने KYC Update करण्यासाठी फ्रॉडस्टर्सकडून मागितलेली खासगी माहिती देतात. अनेक युजर्स या स्कॅममध्ये अडकले असून अनेकांचं आर्थिक नुकसान झालं आहे.
The above contain is retrieved from RSS feed. We do not hold copyrights of it. If someone has problem with content provided us genuine evidence and take it down.