कल्याण/संघर्ष गांगुर्डे – एकिकडे राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी सत्तेत असली तरी दुसरीकडे काही महिन्यांनी येऊ घातलेल्या कल्याण डेांबिवली महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. कल्याण जिल्हा काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच मुंबईत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्या बैठकीत काँग्रेस कार्यकत्यांनी. स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिलीय.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाला काँग्रेसचा पाठींबा असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे यांनी दिली. कल्याण डेांबिवलीतील विविध समस्यांवर पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांची भेट घेण्यासाठी ते पालिका मुख्यालयात आले होते. नवी मुंबई प्रकल्पासाठी इथल्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लोकनेते दि बा पाटील यांचे मोठं योगदान आहे. त्यामुळे काँग्रेस त्यांच्या नावासाठी आग्रही असल्याचे केणे यांनी सांगितले