मुंबई : कॉर्डिलिया क्रूजवरील आणखी 143 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. (Cordelia Cruise) या आधी 66 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. 1 हजार 827 जणांची कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर त्यातील 143 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. त्यामुळे कॉर्डिलिया क्रूजवरील प्रवाशांमधील आतापर्यंत 209 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
30 डिसेंबर रोजी कॉर्डिलिया क्रूज मुंबईहून गोव्याला निघाले होते. परंतु, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारनं परवानगी नाकारली होती. कॉर्डिलिया क्रूजवरील सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

कॉर्डेलिया क्रूझवरील प्रवासी करोनाच्या संसर्गामुळे रविवारी रात्रीपासून क्रूझवरच अडकले आहेत. (Cordelia Cruise) कूझवरील क्रू मधील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने गोवा सरकारने क्रूझवरील प्रवाशांना चाचणीशिवाय उतरण्यास नकार दिला होता. कॉर्डेलिया हे क्रूझ जहाज मुंबईहून गोव्याला निघाले होते.