केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केल्यामुळे शिवसेनेकडून संताप व्यक्त केला जात आहे. नारायण राणे यांच्या या विधानावरून राज्यामध्ये गोंधळ निर्माण झाल्यानंतर नाशिकमध्ये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यानंतर मात्र मंगळवारी राणे यांना अटक करण्यात आली, त्यानंतर रात्री उशिरा नारायण राणेंना जामीनदेखील मंजूर झाला. जामीन मंजूर झाल्यामुळे राणे समर्थकांनी एकच जल्लोष केला, परंतु दिवसभरामधील मारहाणी व राड्यामुळे महाराष्ट्राला काय फायदा झाला, हे मनसेने विचारले आहे. मंगळवारी शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते, बऱ्याच ठिकाणी मोठ्या गर्दीत आंदोलने होत होती. कोरोनाची बंधने असतानादेखील नियमांना धाब्यावर बसवून राज्यभर आंदोलन करण्यात आले. त्यावरून मनसेने मुख्यमंत्र्यांना चांगलाच टोला लगावला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा आंदोलक, दोन्ही गटाचे समर्थक व सरकारवर मनसेने निशाणा साधला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत कालच्या राड्यामुळे महाराष्ट्राला काय फायदा झाला हे उपरोधात्मक टिकेतून सांगितले.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी काय ट्विट केले
एकूणच कालच्या भानगडीमुळे महाराष्ट्राला काय फायदे झाले हे त्यांनी सांगितले. एक म्हणजे डेल्टा, डेल्टा प्लस असे काही नसते, दुसरा म्हणजे घरचेच आंदोलन होते, त्यामुळे आपल्यावर खापर फुटू नये म्हणूनच तिसऱ्या लाटेला सुट्टी. तिसरे म्हणजे सोशल डिस्टनसिंगचा फज्जा पत्रकार विसरले, आता आपण करोनाच्या “कानात”आत्मविश्वासाने सांगू शकतो तू संपला आहेस. असे चार फायदे महाराष्ट्राला झाल्याचे सांगत कोरोनावरील निर्बंधामुळे होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधले आहे. मंगळवारी संदीप देशपांडे यांनी कोरोनाचा विसर पडला का? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला होता.
“कोरोना हृदय सम्राट” गप्प का?
महाराष्ट्रामध्ये काल सकाळपासून कायदा सुव्यवस्था “फाट्यावर” मारून आंदोलन व गर्दी जमवली जात आहे. कोणताही ठिकाणी सोशल डिस्टनसिंग नाही, गर्दीच गर्दी असून “कोरोना हृदय सम्राट” गप्प का? तसेच हो सोशल डिस्टनसिंगचा फज्जा म्हणणारे पत्रकार आज तो शब्द विसरून हा आक्रमक तो आक्रमक म्हणता आहेत, असेही ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.
राणेंच्या त्या वक्तव्यावरून शिवसैनिक आक्रमक
रायगड येथील महाडमध्ये राणेंची जन आशीर्वाद यात्रा पोहोचली. त्यावेळी पत्रकारांसोबत बोलताना स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावरूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना राणेंनी मी असतो तर कानाखाली लगावली असती असे वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यामधील बहुतांश जिल्ह्यात शिवसैनिक आक्रमक झाले आणि नारायण राणेंविरुद्ध रस्त्यावर देखील उतरले आहेत. एकूणच परिस्थिती पाहता राजकीय वातावरण तापले असल्याचे चिन्ह दिसून येत आहे.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.