कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या १६ महिन्यापासून नाट्यगृह आणि सिनेमागृह बंद आहेत.राज्यसरकारने १५ ऑगस्टपासून बहुतांश निर्बंध उठवले आहेत.राज्यासरकारच्या या निर्णयामुळे जनता आणि व्यापारी यांना दिलासा मिळाला आहे.मात्र राज्यातील नाट्यगृह आणि सिनेमागृह बंद आहेत.त्यामुळे अनेक कलाकार सिनेमागृह आणि नाट्यगृह उघडण्यासाठी आग्रही आहेत. त्यातच ठाकरे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि मनसे नेते अभिजित पानसे यांनी राज्यसरकारावर खोचक शब्दात टीका केली आहे.
सरकारने नाट्य कलावंत आणि बॅकस्टेज कलाकारांना निदान रोजगार हमी योजनेत सामील करून खड्डे बुजवण्याची कामं द्यावीत. ( कारण नाट्यगृहात कोरोना आहे, रस्त्यावर नाही ! ) @CMOMaharashtra @mnsadhikrut @MNSAmeyaKhopkar @SandeepDadarMNS @rajupatilmanase @abpmajhatv @ibnlokmat @TV9Marathi
— Abhijit Panse (@abhijitpanse) August 21, 2021
अभिजित पानसे यांनी ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला आहे.”सरकारने नाट्य कलावंत बॅक स्टेज कलाकारांना निदान रोजगार हमी योजनेत सामील करून खड्डे बुजवण्याची काम द्यावीत.कारण नाट्यगृहात कोरोना आहे,रस्त्यावर नाही! असा टोला पानसे यांनी राज्यसरकारला लगावला आहे.त्यामुळे राज्यसरकार कलाकारांच्या परिस्थितीवर लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय.