एकीकडे कोरोनाचे संकट टळले असे म्हणत नाही तोच आतापर्यंत मुंबईमध्ये डेंग्यू (dengue) व मलेरियाची (malaria) साथ पसरण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये (mumbai) ऑगस्ट महिन्यात सगळ्यात जास्त मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पालिकेतील रुग्णालये रुग्णांनी भरून गेली आहेत. मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर आता साथीच्या आजारांचा धोका वाढत आहे. बदलते वातावरण व पाऊस या संसर्गाकरिता पोषक ठरत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आता योग्य ती खबरदारी घेऊन वेळीच वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्यात मुंबईसह उपनगरांमध्ये मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांत वाढ झाल्याचे आढळून आले आहे.
रुग्णसंख्येत वाढ
ऑगस्ट महिन्यात सातशे नव्वद मलेरियाचे (malaria) रुग्ण (Patient) आढळून आले आहेत, तर डेंग्यूचे एकशे पस्तीस रुग्ण सापडले असून, आतापर्यंत एकूण दोनशे नऊ रुग्णांची नोंद झाली आहे. जानेवारीपासून ऑगस्टपर्यंत मलेरियाच्या तीन हजार तीनशे अडतीस (३३३८) रुग्णांची नोंद झाली आहे. जानेवारी महिन्यापासून मुंबईमध्ये मलेरियाचे ३३३८ रुग्ण, लेप्टोस्पायरोसिसचे (Leptospirosis) १३३ रुग्ण, डेंग्यूचे २०९, गॅस्ट्रो आजाराचे १८४८, तर काविळीचे १६५ आणि स्वाईन फ्लू आजाराचे ४५ रुग्ण गेल्या आठ महिन्यांमध्ये आढळले असल्याचे सांगण्यात आले आहे. डेंग्यूचे सगळ्यात जास्त रुग्ण डोंगरी, परळ, वांद्रे पश्चिम या भागांमध्ये आढळले आहेत. कीटकनाशक विभागाने तेरा लाख पंधरा हजार तीनशे त्र्याहत्तर घरांची पाहणी केली आहे. यातील अकरा हजार चारशे ब्यान्नव (४९२) डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यात आली आहेत.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले हे आवाहन
महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी काल महापौर निवासस्थानी डेंग्यू, मलेरियाच्या साथीचा आढावा घेण्याकरिता बैठक घेतली होती. महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज माटुंगा, सायन या भागांत बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी भेट दिली. तसेच या भागांत पाणी कुठल्याही प्रकारे साचून राहू नये, यासंदर्भात योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देशही दिले. मुंबईमध्ये डेंग्यू, मलेरियाचे प्रमाण वाढ होत आहे. साचलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूच्या आळ्या तयार होत असतात. पालिकेमार्फत पाणी साचू देऊ नये, असेही आव्हान केले जात आहे. मुंबईमध्ये इमारतीचे काम जास्त प्रमाणात सुरू असताना या भागात पाणी साचून डेंग्यूच्या अळ्या तयार होत आहेत. त्यामुळे आता नागरिकांनी पाणी साचू देऊ नका, असे आवाहन महापौरांनी केले आहे.
तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
जर लोकांचा ताप दोन ते तीन दिवसांमध्ये कमी होत नसेल, तसेच थंडी, पुरळ येणे, डोकेदुखीचा त्रास होत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अधिक सावधगिरी बाळगावी. कारण ही लक्षणे मलेरिया, डेंग्यूचीही असू शकतात. लहान मुले व वृद्धांकडे लक्ष दिले पाहिजे. पावसाळ्यात ताप, उलटी, जुलाब, डोळे पिवळसर होणे, कावीळ यांसारखी लक्षणे दिसताच पोटविकार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. सम लक्षणांमुळे कोरोना रुग्ण ओळखून त्यादृष्टीने अचूक उपचार करणे आव्हनात्मक ठरत आहे. डेंग्यू व मलेरियाला दूर ठेवण्याकरिता डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधून तिथे आवश्यक ती औषध फवारणी केली पाहिजे. पाणी वाहून जाण्याकरिता योग्य व्यवस्था आहे याची खात्री करून घ्या. डास चावणे टाळण्याकरिता पूर्ण बाह्यांचे कपडे घाला व डास प्रतिबंधक जाळी वापरा, तसेच वेळोवेळी औषध फवारणी करण्याचीही आवश्यकता आहे.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.