सिंधुदुर्ग : जिल्ह्यात बुधवारी १९५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ४५ हजार २५० झाली आहे. तर काल १०५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ४८ हजार ८१७ एवढी झाली आहे. जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ३०६ वर पोहोचली आहे. कोवीड-१९ मुळे काल दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ हजार २५९ वर गेली आहे.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com