दिवसेंदिवस कापसाच्या दरात वाढ होत आहे. अगदी त्याच्या उलट सोयाबीनच्या दरामध्ये घट होत आहे. हे दोन्हीही खरीपातील पिके उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाची आहेत. कापूसाचे उत्पादन खानदेशात जास्त प्रमाणात होते .खानदेशातील पांढरे सोने घेण्यासाठी चक्क परराज्यातील व्यापारी दाखल होत आहेत. यंदा अवकाली पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले असून कापसाला विक्रमी दर मिळत आहे. वातावरणात होणारया बदलामुळे कापूस अधिकचा वेळ झाडाला न ठेवता त्याची वेळेत वेचणी करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.धुळे, पाचोडा, चोपडा, जामनेर येथील शेतकऱ्यांना कापसाचा आधार मिळालेला आहे.Khandesh
कापसाला दरही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. खरीपातील इतर पिकांमधून शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असले तरी कापसाच्या दर हे स्थिर राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण यंदा मराठवाड्यात कापसाच्या क्षेत्रामध्ये घट झाली होती तर सोयाबीनचे क्षेत्र हे वाढलेले होते. त्यामुळे कपाशीची मागणी वाढलेली असल्याने मुहूर्ताचे दर हे 10500 होते तर त्यानंतर आता 8200 दर कापसाचे दर हे स्थिरावलेले आहेत.भविष्यात कापसाचे दर वाढणार असल्याने टप्प्याटप्पाने कापसाची आवक होईल असा अंदाज बांधला जात आहे.
1 लाख क्विंटल कापसाची आवक
जिनिंग प्रक्रिया उद्योग सुरु झाल्याने कापसाला चांगला दरही मिळत आहे. खानदेशात दिवसाकाठी 1 लाख क्विंटल कापसाची आवक होत आहे. कापसाचे हेच दर स्थिर राहतील तर डिसेंबर नंतर यामध्ये सुधारणा होणार आहे. त्यामुळे शेतकरीही सावध भूमिका घेत कापूस विक्रीला आणत आहेत.Khandesh
Credits and copyrights – nashikonweb.com