पुणे : राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्याचसोबत ओमायक्रॉनचा धोकाही वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला आहे.
आता त्यात पुण्याचीही भर पडली असून पुण्यातील पहिली ते नववीच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यात आज झालेल्या कोव्हिड आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरी हद्दीतील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अद्याप पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील शाळांबाबत अद्याप निर्णय झाला नाही.