सिंधुदुर्ग : जिल्ह्याच्या पर्यटन संकेतस्थळाचा लोकार्पण कार्यक्रम जिल्हा प्रशासनाच्या वतीने पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी सिंधुदुर्ग विमानतळ, चिपी येथे संपन्न झाला. या संकेतस्थळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. sindhudurgtourism.in असे जिल्ह्याचे पर्यटन संकेतस्थळ असून जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, निवासस्थाने, समुद्रकिनारे, गड-किल्ले, खाद्यसंस्कृती इत्यादी सर्व माहिती येथे उपलब्ध होणार असून या संकेतस्थळावर जास्तीत जास्त लोकांनी भेट द्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा माहिती व तंत्रज्ञान विभागातील बसवराज चिकोडी आणि शशांक नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.