अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी वनखात्यानं गठित केलेल्या चौकशी समितीऐवजी दुसरी चौकशी समिती तयार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर केंद्रीय मंत्र्यांना पत्र पाठवणार असल्याचं म्हटलं आहे. वन विभागानं सध्या जी चौकशी समिती नेमलेली आहे त्या समिती मधील सदस्य हे श्रीनिवास रेड्डी यांच्यासोबत काम केलेले आहेत. ही चौकशी समिती दीपाली चव्हाणला न्याय देऊ शकत नाही, असा दावा नवनीत राणा यांनी केला आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.