सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झालेला सहदेव दिर्दो आणि बॉलिवूड रॅपर बादशाह यांचं नवं गाणं नुकतंच युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘बचपन का प्यार’ गाण्याची नेटकऱ्यांमध्ये इतकी लोकप्रियता आहे की प्रदर्शनाच्या काही तासांच्या आतच व्हिडीओला लाखों व्हिव्यूज मिळाले आहेत.
सोशल मीडियावर हे गाणं ऐकून बादशाहने सहदेवसोबत गाणं बनविणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर बादशाहने सहदेवला मुंबईला भेटायला बोलावलं होतं. आपला शब्द खरा करत बादशाहने सहदेवसोबतचं गाणं प्रदर्शित केलं आहे. हे गाणं बादशाहने त्याच्या ऑफिशिअल युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित केलं आहे.
बादशहाने इन्स्टाग्रामवर सहदेवचा एक व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं, “सहदेव जेव्हा तू मला भेटायला तुझ्या गावाहून मुंबईला आलास तेव्हा माझ्यासाठी एक भेट घेऊन आलास. सहदेवने दिलेली भेट माझ्या किमती भेटवस्तूंपैकी एक आहे. मी सहदेवच्या उज्ज्वल भविष्याची आशा करतो. मला विश्वास आहे की हे बचपन का प्यार जग कधीही विसरू शकणार नाही”.असं म्हणत बादशाहने सहदेवचं कौतुक केलं आहे.
Credits and Copyrights – lokshahinews.com