सोलापूर/प्रतिनिधी – राज्यात आलेल्या महापुरामुळे अनेक नागरिक विस्थापित झाले असून सरकारने त्यांचे तातडीने पुनर्वसन करून नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे मोहोळ तालुका अध्यक्ष राजू आवारे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी मागण्याचे निवेदन तहसीलदार जीवन बनसोडे यांना देण्यात आले.तहसीलदाराना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जुलै 2021 या वर्षी दोन दिवसांमध्ये साधारण 1600 मी.मी.इतका पाऊस झाला असून पावसाच्या किमान 90 टक्के पाऊस पडला आहे.त्यामुळे दरड कोसळणे, शेतजमीन खरडून जाणे तसेच उभी पिके वाहून गेली आहेत.शेतकऱ्यांच्या शेतात दगड गोटे शिल्लक राहिले आहेत.
या महापुरात मागासवर्गीय अल्पभूधारक भरडले गेले आहेत.लहान बालके व महिलांच्या अडचणीत वाढ झाली आहे.ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना कारखान्यांनी नुकसान भरपाई द्यावी व तशा प्रकारचा आदेश शासनाने कारखान्याना द्यावा. कापूस,सोयाबीन,डाळ,फळे,भाज्या,उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानी बाबत सरकारने पिकांची जाहीर केलेली एफआरपी आणि एमएसपी घाऊक तसेच किरकोळ बाजारात अडलेली धान्याची आणि पिकांची किंमत मुल्यधारीत करून संबधित शेतकऱ्याला पिकांची आणि उत्पादनाची किंमत मदत म्हणून करावी.महापुरात झालेल्या नुकसानी बाबत सरकारी निकषांनुसार केली जाणारी मदत तुटपुंजी आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या एकरी उत्पादन होण्याऱ्या पिकाचे बाजरी मूल्य भरपाई म्हणून शेतकऱ्यांला मिळावे.नुकसानीमुळे दुबार पेरणी करणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना बाजार भाव प्रमाणे झालेल्या नुकसान भरपाईची मदत करावी.यावेळी ता.अध्यक्ष राजेंद्र आवारे,प्रकाश सोनटक्के, सचिन गवळी,शशिकांत सोनवणे आदी उपस्थित होते.
Credits and Copyrights – Stream7news.com