मुंबई : एसटी कामगारांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या न विनंती केली आहे. या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, सततच्या समस्यांमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या वेदनादायी आहेत.
पण माझी एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा कळकळीची विनंती आहे की, आत्महत्येसारखे टोकाचे आणि चुकीचे पाऊल उचलू नका. आपण ही लढाई एकत्रित आणि भक्कमपणे न्यायालयात लढू.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.