नांदेड : देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. यावेळी फडणवीस यांनी एका प्रचारसभेत बोलताना महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय.
महाविकास आघाडीतील लोक कशात भ्रष्टाचार करतील याचा नेम नाही. जमेल त्यात खात आहेत. सामान्य माणसाची अवस्था वाईट आहे.
अतिवृष्टीत मोठं नुकसान झालं पण या सरकारने रुपयांची मदत केली नाही. बोलायला बांधावर जातात, मोठ्या घोषणा करतात. तसेच फडणवीस म्हणाले की, मतदानानंतर हे सरकार देगलूर, बिलोलीची वीज कापतील.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.