मुंबई : आगामी गोवा विधानसभा निवडणुकीवरून दिवसेंदिवस राजकीय वातावरण तापत आहे. एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
“आम्ही सोंगाडे नाही, देवेंद्र फडणवीस यांची अवस्था कुणी खुर्ची देता का खुर्ची अशी झाली आहे” अशी टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
गोवा विधानसभेसाठी शिवसेनेने दहा उमेदवारांची यादी तयार आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी यावेळी दिली. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, “राजकीय पक्षांनी गोव्याची प्रयोगशाळा केली आहे. गोव्यात आम्ही लढू आणि जिंकू सुद्धा असा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.