मुंबई : मुंबईत कोरोना रोखण्यात धारावीने आघाडी घेतली असून फेब्रुवारी मध्यापासून सुरू झालेल्या दुसऱ्या लाटेदरम्यान आज नऊव्यांदा एकही रुग्ण सापडला नाही तर आठवड्याभरात दुसऱ्यांदा धारावीने कोरोनावर आपली पकड मजबूत केली आहे. धारावीबरोबर मध्य मुंबईतील वर्दळीचे भाग असणाऱ्या दादर आणि माहीममध्येही रुग्णसंख्या घटली असून दादरमध्ये 2 तर माहीममध्ये 3 रुग्ण सापडले. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर भर देण्यात येत असल्याने कोरोना रुग्णांची संख्या कमालीची घटली आहे. धारावीत सक्रिय रुग्णांचीही संख्या कमी होत असून 35 वरून 25 वर पोहोचली आहे.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com