तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष अफगाणिस्तानच्या स्थितीवर आहे. वीस वर्षांनी तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर संपूर्ण देशामध्ये दहशत माजवण्यास सुरुवात केली आहे. येथील नागरिकांचा छळ चालू केला आहे. बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटींनी सुद्धा अफगाणिस्तानतील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. तर बऱ्याच लोकांनी त्यांचे अफगाणिस्तानतील काही अनुभव मांडले आहेत.
जीवघेणे अनुभव आल्याचा कबीर खान यांचा खुलासा
बॉलिवूड दिग्दर्शक कबीर खान यांनीसुद्धा अफगाणिस्तानमध्ये शूटिंग करताना त्यांना आलेला भयानक अनुभवदेखील मांडला आहे. २००६ सालामध्ये कबीर खान ‘काबुल एक्सप्रेस’ या सिनेमाच्या शूटिंगकरिता संपूर्ण टीमबरोबर अफगाणिस्तानला गेले होते. त्यावेळी जीवघेणा अनुभव आल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये कबीर खान म्हणाले की, “खरं सांगायचे तर ते प्रचंड भीतीदायक होते. जे काही घडले ती खरं तर आम्हाला मारण्याची एका प्रकारे धमकी होती. आम्हचीच पहिली टीम असू जी तालिबाननंतर अफगाणिस्तानमध्ये शूटिंग करत होती. त्यामुळे संपूर्ण मीडियाचे लक्ष आमच्यावर होते.”
अफगाण सरकारच्या पाठिंब्याशिवाय हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नसता
पुढे ते म्हणाले, “अफगाणिस्तानमध्ये सर्व काही सुरळीत चालू झाल्यानंतर तिथे पहिल्यांदा एका सिनेमाचे शूटिंग सुरू होते. तेदेखील बॉलिवूड चित्रपटाचे. त्यामुळे मीडियामध्ये येणारी दृश्य सीमेपार असलेल्या तालिबान्यांना खटकत होती. कारण त्यांनी चित्रपट, फोटोग्राफी यांवर बंदी आणली होती. त्यामुळेच त्यांनी आम्हाला जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली. आमच्या टीमकरिता खरोखरच पाच लोकांना पाठवण्यात आल्याची माहिती आम्हाला भारतीय राजदूतांमार्फत मिळाली. त्यामुळे आम्हाला थेट शूटिंग थांबवावे लागले.” असे कबीर खान म्हणाले. यानंतर परंतु अफगाण सरकारने सुरक्षा पुरवण्याची टीमला हमी दिल्याचे देखील ते म्हणाले. त्यावेळी कबीर खान यांनी अफगाणिस्तान सरकारचे आभार मानले. तालिबान्यांच्या धमक्यांना न घाबरता पुढे जावे याकरिता अफगाण सरकारने त्यावेळी पाठिंबा दिला. त्यांच्या पाठिंब्याशिवाय हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नसता असे कबीर खान म्हणाले.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.