नाशिक…दिंडोरी तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून गेल्या चार दिवसात दिंडोरी शहरासह आजूबाजूच्या परिसरातील तब्बल 17 दुकाने फोडली आहे. चार दिवसापुर्वी चोरट्यांनी 10 दुकाने फोडून लाखो रुपयांची चोरी केली होती. Dindori thieves
ही घटना घटना ताजी असतांनाच काल मध्यरात्री पुन्हा चोरट्यांनी आणखी 7 दुकानांचे शटर तोडून धाडसी चोरी केली आहे. त्यामुळे व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.जिल्ह्यातील वृत्तपत्र असलेल्या देशदूत विभागीय कार्यालयासह कृषी सेवा केंद्रांच्या दुकानांचा यात समावेश आहे.

काही दिवसापूर्वी दिंडोरी पोलिस निरीक्षकांची बदली झालेली असताना चोरट्यांनी दुकान फोडीचे सत्र सुरू केले आहे. धाडसी चोरीच्या घटना घडत असल्याने चोरांची मोठी टोळी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान या घटनेची पोलिसांत तक्रार देण्यात आली असून पोलीस तपास सुरू करण्यात आला आहे.मात्र अद्याप कोणालाही अटक होऊ शकलेली नाही. Dindori thieves
Credits and copyrights – nashikonweb.com