सोशल मीडियावर नेहमीप्रमाणेच वेगवेगळ्या शॉर्ट व्हिडीओंची धूम आहे. यात म्यूझिक कंपोझर यशराज मुखातेचे मॅशअप म्हणजे मनोरंजनाची वेगळीच पर्वणी असते. यशराज मुखातेचे छोटे मॅशअप व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.
यावेळी असाच एक नवा व्हिडीओ यशराज मुखाते घेऊन आला आहे. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आणखी एक मजेदार मॅशअप अपलोड केले आहे. “May you all safar” हे मॅशअप सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.यशराज ने ‘रसोड़े में कौन था’, ‘पावरी हो रही है’ और ‘त्वाड्डा कुत्ता टॉमी, साड्डा कुत्ता, कुत्ता’ असे एकापेक्षा एक मॅशअप तयार केले आहेत. त्याच्या या मॅशअपमुळे सोशल मीडियावरील वातावरण ढवळून निघाले होते. नेटकऱ्यांनी त्याच्या या मजेदार व्हिडीओंना पसंद तर केलेच.
मात्र, अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांनीसुद्धा त्याच्या या मॅशअप्सना सोशल मीडियावर शेअर केले होते. यशराजच्या या यूनिक कंटेंटचे नेटकरी दिवाने आहेत. यानंतर आता यशराजने “May you all safar” हा नवा मॅशअप व्हिडीओ अपलोड केला आहे. त्याचा हा व्हिडीओ अतिशय मजेदार आणि मनोरंजनात्मक आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला मला प्रवास करायला खूप आवडतं असं सांगताना दिसत आहे.
Credits and Copyrights – lokshahinews.com