लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवसच उरले असताना हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या (hirwal Education Trusts ) वतीने पर्यावरणपूरक गणेशमूर्तीच्या कीटचे (kit) वाटप करण्यात आले. एकूणच पर्यावरणाचा होणारा ऱ्हास लक्षात घेता हा उपक्रम राबविण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल आत्मियता निर्माण व्हावी यासाठी हिरवळ एज्युकेशन ट्रस्टने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. आज या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आणि या मूर्ती तयार करण्याचे साहित्य असलेल्या कीटचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थी आणि पालकांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. गुरुकुल शाळा आणि महाविद्यालयात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संतोष बुटाला, सुदेश कदम, विद्या गुजर, कोमल गायकवाड, राकेश वडवळकर, गणेश भोजने, सीमा सुर्वे, अभय परब, विनय खैरे, महाड प्रेस असोसिएशनचे कार्याध्यक्ष रवी शिंदे, विद्यार्थी आणि पालक यावेळेस उपस्थित होते.
विशाल पेडामकर या विद्यार्थ्याने कीटमधील साहित्याचा वापर करून गणेशमूर्ती कशी तयार करायची याचे प्रात्यक्षिक यावेळेस दाखविले. या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीसाठी साचा, शाडूची तयार माती, नैसर्गिक रंग, ब्रश यांचा समावेश असलेले एक कीट विद्यार्थी आणि पालकांना माफक दरात संस्थेने उपलब्ध करून दिले आहे. केवळ काही तासांत ही आकर्षक मूर्ती तयार होते. कीटमध्ये मोदकाच्या आकारातील एका सीडबॉलचाही समावेश आहे. मूर्तीचे विसर्जन घरातील बादलीमध्ये केल्यानंतर ती माती एका खड्ड्यात टाकायची आहे. त्यामुळे सीडबॉलमधील बी रुजून त्यापासून एका वृक्षाची निर्मिती होणार आहे.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींचे पाण्यात लवकर विघटन होत नाही. त्यामुळे जल पर्यावरण धोक्यात येते. मातीच्या मूर्ती लवकर विघटित होतात आणि त्यामुळे पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचत नाही. त्या उद्देशाने आम्ही हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुरू केला आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाबाबत जागृती व्हावी हा उद्देशही त्यामागे आहे. यावेळी हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष किशोर धारिया यांनी सांगितले, तर या हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या उपक्रमाला विद्यार्थी आणि पालकांकडून उत्तम प्रतिसाद लाभला आहे.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.