तालिबानने (Taliban) अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात घेतल्यानंतर मुल्ला अब्दुल गनी बरदार हे देशाचे नवे राष्ट्रपती होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. तालिबान लवकरचं अफगाणिस्तानचं नाव बदलून ‘इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान’ ठेवण्याची चिन्ह आहेत. रविवारी सकाळी तालिबान समर्थकांनी काबूलवर हल्ला केल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला आहे. याशिवाय उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनीही अफगाणिस्तान सोडले आहे. त्याचबरोबर देशवासी आणि परदेशी लोकही युद्धग्रस्त देशातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतानाचे चित्र आहे.

काय आहे २५ वर्षांपूर्वीचा इतिहास
२५ वर्षापूर्वीही तालिबानने अफगाणिस्तानवर अशाचप्रकारे नियंत्रण प्रस्थापित केले होते. तत्कालीन राष्ट्रपती मोहम्मद नजीबुल्लाह यांची निर्घृणपणे हत्या करुन त्यांचा मृतदेह एका खांबाला लटकवण्यात आला होता. १९८४ साली पीपर्ल डेमोक्रॅटिक पार्टी ही सत्तेत होती. हा पक्ष एक कम्युनिस्ट विचारसरणीचा होता, सोव्हिएत रशियाच्या मदतीने नजीबुल्लाह हे त्यावेळी राष्ट्रपती म्हणून निवडून आले आणि त्यांनी देशात अमुलाग्र बदल करायला सुरुवात केली. नजीबुल्लाह यांनी देशाची राज्यघटना निर्माण केली, त्यानंतर देशाचे नाव रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान असे केले. महिलांना अनेक हक्क प्रदान केले आणि महत्वाचं म्हणजे धर्मनिरपेक्षता या तत्वाची अंमलबजावणी त्यांनी केली. या निर्णयामुळे सामान्य लोकांमध्ये त्याच्याबद्दल मोठी नाराजी होती. त्यामुळे कट्टर दहशतवादी संघटना असलेल्या तालिबानला लोकांचं मोठं समर्थन मिळाले. त्यावेळेस अमेरिकेच्या आणि पाकिस्तानच्या छुप्या पाठिंब्याच्या मदतीन तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवलं. या दरम्यान नजिबुल्लाह यांनी रेडिओच्या माध्यमातून यूएन कडे मदत मागितली होती पण ती त्यांना मिळाली नाही.
काबूलमध्ये तालिबानी लोकांनी नियंत्रण मिळवल्यानंतर राष्ट्रपती नजीबुल्लाह यांना शरण येण्यास सांगितले, त्यास त्यांनी नकार दिल्यानंतर तालिबान्यांनी त्यांना अक्षरक्ष फरफटत नेले. एका ट्रकच्या मागे बांधून रस्त्यावरुन फरफटत नेलं आणि नंतर त्यांच्या डोक्यात गोळ्या घातल्या. एवढ करुनही त्यांनी राष्ट्रपतींच्या मृतदेहाला एका विजेच्या खांबाला लटकावले. आता पुन्हा एकदा तालिबान्यांनी अफगाणिस्तावर पूर्ण नियंत्रण मिळवलं आहे, यामध्ये देशातील महिला, बालके व सामान्य नागरिकांचा समावेश आहे.

Credits and. Copyrights – Maay Marathi