कोरोनाची रुग्णसंख्या आता दिवसेंदिवस वाढत असल्याचे आपण सर्वच पाहात आहोत. त्यामुळे कोरोनाचे नियम(Corona rules) पाळले गेले पाहिजेत हे सर्वांनी समजून घ्यायला हवे. एकीकडे कोरोना गायब झाला असा चुकीचा गैरसमज काहींचा झाला आहे, परंतु तिसरी लाट (third wave) येण्याची शक्यता आहे ही वस्तुस्थिती आता सर्वांनी समजून घ्यायला हवी अन्यथा ‘ये रे माझ्या मागल्या’ असं होईल व पुन्हा सर्व बंद करण्याकरिता भाग पाडू नका, असा कडक इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार( Ajit Pawar) यांनी दिला आहे. ते पुण्यामध्ये मीडियाशी बोलत होते. “कोरोना संपल्याच्या अविर्भावात बरेच जण वावरत असून, हे काही योग्य नाही. हे थांबायला हवे. काही लोक रस्त्यावर उतरून राजकारण करत आहेत. तिसऱ्या लाटेमुळे पुन्हा सर्व काही बंद करण्याची वेळ लोकांनी सरकारवर आणू नये”, असेही अजित पवार म्हणाले.
मंदिर उघडण्याच्या मुद्द्यावरून राजकारण कशाकरिता?
“काही लोक मंदिर उघडण्याकरिता आंदोलन करत आहेत, परंतु मंदिराचा मुद्दा हा राजकीय हेतूने आहे. केंद्र सरकारनेदेखील सांगितले आहे की, खबरदारी घ्या, मग हे राजकारण कशाकरिता करत आहेत”, असा प्रश्न अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला.
काही लोकांमुळे सहकारी खाते बदनाम होत आहेत
राज्य सहकारी बँकेवर (State Co-operative Bank) ईडीने (ED)छापेमारी केल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले, परंतु अशी कोणतीही घटना घडलेली नाही. या पूर्णपणे खोट्या बातम्या आहेत. माध्यमांनी विश्वासार्ह बातम्या दिल्या पाहिजेत. त्यामुळे लोकांचा, आमचा विश्वास आता उडत चालला आहे, असेही अजित पवार म्हणाले. “मी चाळीस वर्ष राजकारणात असून, मंत्री म्हणून शपथ घेऊन जबाबदारीने बोलत असतो. शहानिशा न करता बातम्या दिल्या जातात हे अतिशय दुर्दैवी आहे, तर काही लोकांमुळेच सहकारी खाते बदनाम (Infamous) होत आहेत”, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला.
शाळा सुरू करण्यासंदर्भात टास्क फोर्सशी चर्चा करून अंतिम निर्णय
शाळा सुरू करण्यासंदर्भात दोन मतप्रवाह असून, त्याप्रमाणे दिवाळीनंतर शाळा चालू करण्याचे काही लोक म्हणतात, तर दुसरा मतप्रवाह आहे तो म्हणजे कोरोनाची रुग्णसंख्या कमी आहे. तिथे शाळा चालू करा. यासंदर्भात मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतील. इतर राज्यांनी शाळा सुरू केल्या असल्या, तरीही आम्ही टास्क फोर्सला विचारून निर्णय घेणार आहोत. दिवाळीपूर्वी शाळा सुरू कराव्यात अथवा नंतर, असे दोन मतप्रवाह आहेत.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.