मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका, अशा बोचरा वार भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांचं नाव न घेता केलाय.

महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी रुपाली चाकणकरांचं नाव निश्चित झालंय. आज त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वीच आज सकाळीच चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन चाकणकरांवर घणाघाती हल्ला चढवलाय. महिला आयोगाचा अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका, असा हल्ला चढवत जर चाकणकरांची निवड झाली तर प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल, असा सल्ला त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये चाकणकरांचं नाव घेतलेलं नाही.
पण रात्रीपासून महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चाकणकरांची निवड निश्चित झाल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे जरी चित्रा वाघ यांनी नाव घेतलेलं नसलं तरी त्यांचा रोख चाकणकरांकडे आहे, हे स्पष्ट आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.