पुणे- ‘मनसे नगरसेवक साईनाथ बाबर याच्या सहकार्यातून ही शाळा उभी राहत आहे. या शाळेचे भूमीपूजनही माझ्याच हस्ते झाल होतं. सर्वात महत्त्वाचे भूमिपूजनानंतर इमारत उभी राहणं गरजेचं आहे. कारण आजपर्यंत आम्ही भूमिपूजनाच्या केवळ पाट्याच पहिल्या आहेत. माझे सगळेच नगरसेवक जिकडे- जिकडे निवडून आले, तिकडं तिकडं उत्तम काम केलं.’ साईनाथ बाबर यांनी उभारल्या ईलर्निंग शाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
राज ठाकरे तीन दिवशीय पुणे दौऱ्यावर होते. कोरोनामुळे आज दोन वर्ष झाली सगळ्या शाळा बंद होत्या, आता हळूहळू शाळेत जायला लागली आहे. काही ठिकाणी अजून शाळा भरत आहेत. मात्र मला एक खंत आहे. या कोरोनामुळे परीक्षा न देता पास झाले यात मुलांना शंभर टक्के, 99 टक्के मार्क मिळाले. मी विचार करता होतो की आमच्या वेळी होता कुठे तो कोरोना? आमची दहावी आम्ही धडधडतपास केली.दहावीतील माझे गुण काळाइतर तुम्हाला कमाल वाटेला असे म्हणताच एकच हशा पिकला.
ऑनलाईनमुळे घरातूनच शिक्षकांच्या बरोबर बोलणे, क्लास अटेंड करणे यामुळे प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिकण्याची मजा निघून गेली आहे. इतकंच काय पहिली दुसरीच्या मुले तर पहिल्यांदाच शाळेत जात आहे, त्यामुळे त्यांना कळेल की नेमके शाळा कशी असते.
आज ई लर्निंगच्या निमित्ताने का होईना मुलं शाळेत जात आहेत. मुलांना खेळताना बघून बरं वाटतं. शाळा सुरु झाल्या याचा आनंद वाटतो. हे ई-लर्निंग वगैरे ठीक आहे, पण येत्या दहा पंधरा वर्षाच्या काळात ही लिहू शकतील की नाही याची काळजी आहे. कारण सगळंच मोबाईल आणि संगणकावरच सगळं करावं लागते. स्वतःच्या हाताने अक्षर ओळख होईल का? अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र साईनाथाने ई-लर्निंग शाळेचे केवळ भूमीपूजन करून शाळेचे इमारत उभी केले हे महत्वाची गोष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.