स्रोत: रत्नागिरी खबरदार
गेल्या बराच काळापासून मुंबई क्रूझ ड्रग प्रकरण गाजत आहे. याप्रकरणी बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. कालच त्याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर याप्रकरणाला काहीसं वेगळं वळण लागलं असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या आहेत. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. त्यावरुन सध्या वादंग उठला आहे. तसेच, त्यानंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.

आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी याप्रकरणाबाबत संवाद साधला. एनसीबी प्रकरणी क्रांती रेडकर यांचा काय संबंध? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. याशिवाय बाहेरचे अधिकारी येऊन महाराष्ट्राला बदनाम करतायत, असा आरोपही आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, “एनसीबी प्रकरणात क्रांती रेडकर यांचा काय संबंध? ही लढाई एनसीबी आणि इतर अशी सुरु आहे. क्रांती रेडकर यांच्यावर मला वाटत नाही कोणी व्यक्तीगत टीका केलीये, मी तरी पाहिलं नाही. नक्कीच आता महाराष्ट्रात ईडी, सीबीआय, एनसीबी हे बाहेरचे अधिकारी येऊन आमच्या मराठी लोकांना त्रास देत आहेत.”

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, “ज्या प्रकारे दिल्लीतून आक्रमण सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा ज्यांच्या मानगुटीवर कारण नसताना बसण्याचा प्रयत्न होतोय, खोटे गुन्हे दाखल केले जातात, देगलूरमध्ये देखील धाडी पडल्यात अशोकराव मराठी नाहीत का?, पवार यांचे नातेवाईक मराठी नाहीत का? सगळेच मराठी आहेत. प्रश्न सत्य-असत्य लढायईचा आहे.”
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.