वसई : राज्यात भाजपा-शिवसेना यांच्यात कुरघोडी सुरु असतानाच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं नारायण राणे मुंबई, कोकणच्या दौऱ्यावर आहेत. वसईत नारायण राणेंनी थेट एकनाथ शिंदेंचे नाव घेत ते शिवसेनेत कंटाळले असून त्यांना लवकर आमच्यात घेऊ. एकनाथ शिंदे केवळ सही पुरतेच मंत्री आहेत असा दावा केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी राणे म्हणाले की, शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांना केवळ सही पुरतं ठेवलं आहे. मातोश्रीच्या आदेशाशिवाय एकही सही करु शकत नाही. ते शिवसेनेत कंटाळले असून आमच्याकडे आले तर त्यांना घेऊ. इतकचं नाही तर मनात आणले तर ठाकरे सरकारचं विसर्जन करु असंही नारायण राणे म्हणाले आहेत. तसेच मुंबई-ठाणे-वसई-विरार आमच्या हाती द्या. या भागचा विकास करुन दाखवू. माझ्यावर टीका केली तर मंत्रिपद मिळतं. मी ज्यांना शिवसेनेत आणलं ते माझ्यावर टीका करतात असं म्हणत नारायण राणेंनी नीलम गोऱ्हेंचा समाचार घेतला आहे.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.