मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक अनेक खळबळजनक आरोप आणि दावे करताना दिसत आहेत.
सुरुवातीला समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर मलिकांनी भाजपचे विधासभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यानंतर महाविकास आघाडीतील नेते आणि भाजप पुन्हा आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांनी मलिकांचे कौतुक केले असून, आम्ही कोणालाही अंगावर घेण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना नवाब मलिक यांना पाठिंबा दर्शवत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर सीबीआय, इडी, आयकर विभाग अशा पद्धतीने धाडी टाकत आहेत, जसे की ते भाजपाचे नोकर असावे. मात्र, २०२४ नंतर परिस्थिती बदलणार असून, हेच शस्त्र तुमच्यावर उलटणार आहे. राज्यात काय सुरू आहे, हे महाराष्ट्रातील जनता बघत आहे.
२०२४ मध्ये जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. नवाब मलिक यांना मुख्यमंत्र्यांनी पाठिंब दिला आहे. मुख्यमंत्र्यांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले आहे, त्यामुळे या लढाईत मलिक एकटे नाहीत. आम्ही कोणालाही अंगावर घेण्यास तयार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.