
कल्याण दि.6 ऑगस्ट :
बिल न भरल्याच्या कारणास्तव खंडीत करण्यात आलेला सिग्नल यंत्रणेचा वीज पुरवठा महावितरणकडून रात्रीलाच पूर्ववत करण्यात आला. त्यामूळे आज सकाळपासून इथली सिग्नल यंत्रणा पुन्हा पूर्ववत सुरू झाली आहे.
बिल न भरल्याच्या कारणास्तव लालचौकी इथल्या सिग्नल यंत्रणेचा वीज पुरवठा महावितरणकडून खंडीत करण्यात आल्याचा प्रकार काही जागरूक नागरिकांनी उघड केला होता. त्याबाबत केडीएमसी प्रशासनाने तातडीने सूत्र हलवत महावितरणशी संपर्क साधला आणि त्यानंतर रात्री 10.30 च्या सुमारास महावितरण कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा पुन्हा सुरळीत केला. त्यामुळे आज सकाळपासून सिग्नल यंत्रणा पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
This News has been retrieved from RSS Feed. If you Own this news please contact us for credits.