मंत्रालयातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर गावदेवी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. मंत्रालयात कॉल आल्यानंतर या कॉलची पडताळणी करण्यासाठी मंत्रालयातून सिल्व्हर ओकमध्ये फोन करण्यात आला. पडताळणीनंतर हा फोन कॉल सिल्व्हर ओकमधून नसल्याचे स्पष्ट झाले. मंत्रालयातून या कॉलचा शोध घेण्यासाठी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानुसार पोलिस शिपायाने गावदेवी पोलिस गाठत घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे या खोट्या कॉलच्या प्रकरणात गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हे प्रकरण गंभीर असल्याने हे प्रकरण गुन्हे शाखेकडे देण्यात आले आहे.
या फोनच्या प्रकरणात खंडणीविरोधी पथकाने एकाला पुण्यातील जेऊर येथून ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेली व्यक्ती कोण आहे, त्याने कुणासाठी पवारांच्या आवाज काढत कॉल केला होता, या संदर्भात पोलिसांनी मोठी गुप्तता पाळली आहे. तसेच कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत हा फोन करण्यात आला होता, याबाबतची माहिती पोलिसांनी दिलेली नाही.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com