नाशिक : राज्यात वस्त्रोद्योग धोरण 2018-2023 अंतर्गत वस्त्रोद्योग घटकांना वीज दरात सवलत लागू करण्यात आली असून वीजदर सवलतीस पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांना नोंदणी करण्यासाठी पुढील तीन महिन्यांकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने यंत्रमाग घटाकांनी नोंदणी करून या सवलतीचा लाभ घ्यावा, असे वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी कळविले आहे.
वस्त्रोद्योग धोरणांतर्गत 25 फेब्रुवारी 2021 अन्वये 27 अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग घटकांसाठी वीजदर सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यापूर्वी देण्यात आलेल्या मुदतवाढी दरम्यान बहुतांश यंत्रमाग घटकांनी नोंदणी केली नसल्याने अशा उद्योगांना नोंदणी करण्यासाठी पुढील तीन महिन्यांकरिता मुदत वाढ देण्यात आली आहे. त्याकरिता संबंधित यंत्रमाग घटकांनी दिलेल्या मुदतीच्या आत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे, असे वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी कळविले आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.