सिंधुदुर्ग : यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. परीक्षेच्या स्वरुपापासून विविध शंकांचे निरसन यात होणार आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या या संकल्पनेची सुरुवात आजपासून होत आहे. बुधवार दि. 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत हे मार्गदर्शन फेसबुक लाईव्हद्वारे https://www.facebook.com/Collector-Office-Sindhudurg-101061044850492 ऑनलाईन होत आहे. प्रथमच अशा अभिनव उपक्रमाची सुरुवात होत असून, आज होणाऱ्या या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर आणि सहायक जिल्हाधिकारी संजिता महोपात्रा सहभागी होणार आहेत. यूपीएससी परीक्षेची तयारी कशी करावी, आत्मविश्वासाने मुलाखतीला कसे सामोरे जावे, येणाऱ्या अडचणींवर मार्ग कसा काढावा, या बरोबरच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्न, शंका यांचे निरसन केले जाणार आहे. या उपक्रमात यापुढेही जिल्ह्यातील विविध अधिकाऱ्यांना सहभागी करुन एमपीएससी परीक्षेबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार असून, विद्यार्थी-विद्यार्थिंनींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.