फेसबुकने छोटे व मध्यम उद्योजकांना लघु व्यवसाय कर्जाचा उपक्रम (MSME) सुरू केला आहे. (Facebook will give Loans) त्यामुळे या उद्योगांना पाच लाख ते पन्नास लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हे कर्ज देशभरामधील दोनशे शहरांमध्ये उपलब्ध केले जाणार आहे. याकरिता फेसबुकने इंडिफीशी करार केला आहे. ही कंपनी लघु व्यवसाय उपक्रमाला कर्ज वाटप करते.
आता व्यावसायिकांना कमी वेळेत लोन मिळणार
फेसबुक इंडियाचे व्हीपी व एमडी अजित मोहन यांनी हे कर्ज लाँच केले आहे. या कर्जाकरिता कोणताही collateral लागणार नसून हे कर्ज पाच दिवसांमध्ये मंजूर केले जाणार आहे. याचा व्याजदर १७-२० % एवढा असेल. महिला व्यावसायिकांना व्याजदरात ०.२% सूट दिली जाईल. लोन मिळविण्यास त्रास होत असलेल्या व्यावसायिकांना कमीत कमी कालावधीत लोन मिळावे यासाठी ही सोय फेसबुकने केल्याचे त्यांनी सांगितले.
व्यवसाय कर्ज सहज मिळावे हा त्यामागचा उद्देश
मोहन म्हणाले की, या मोहिमेचे लक्ष्य हे फक्त व्यवसाय कर्ज सहज, सोपे बनविणे हा आहे. भारत हा पहिला देश आहे की, जिथे फेसबुकने ही योजना आणली आहे. Ficci चे अध्यक्ष उदय शंकर यांनी सांगितले की, फेसबुकची ही मोहिम प्रशंसेस पात्र आहे. लघु व्यवसाय कर्जाचा उपक्रम सेक्टरला पुढे नेण्याकरिता यामुळे मदत मिळणार आहे. ज्या कंपन्या काही तारण ठेवू शकत नाहीत, त्यांच्याकरिता हे कर्ज उपयोगाचे आहे. जर या कंपन्यांना खेळते भांडवल मिळाले तर त्या कंपन्या विकास करू शकतील. कर्जाला गॅरंटी काही मिळत नसल्यामुळे बँका व अन्य कंपन्या त्यांना कर्ज देत नाहीत. ही समस्या सुद्धा दूर होणार आहे. नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी सांगितले की, लघु व्यवसाय कर्जाचा उपक्रम हा देशाच्या विकासाचा कणा असून, फेसबुकची ही मोहिम या विकासाला मदत करण्याकरिता एक मोठे पाऊल आहे.
फेसबुकद्वारे व्यापारी वर्गाला मदत (Facebook will give Loans)
अजित मोहन हे म्हणाले की, फेसबुक याच्या माध्यमातून या व्यापारी वर्गाला मदत करेल. यामध्ये फेसबुकचा काहीसुद्धा फायदा नाही. इंडिफीशी करार केला आहे, मात्र व्यवसाय करण्याचा काहीही उद्देश नाही.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.