मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकीनाका बलात्कार प्रकरण आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरुन पत्र लिहिलं होतं. त्या पत्राला काल मुख्यमंत्र्यांकडून उत्तर देण्यात आलं. याच मुख्यमंत्र्यांच्या पत्रावरुन आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस बोचरी टीका केली आहे. मीडियाशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी गेली 25 वर्षे झाली पाहतोय. सरकार कुणाचंही असो, राज्यपाल कुणाचेही असो, अशाच प्रकारचं पत्र फॉरवर्ड केलं जातं. पण, राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांकडून प्रत्युत्तर दिल्याचं कळालं. मुख्यमंत्री कार्यालयानं अपरिपक्वता दाखवली. मुख्यमंत्री कार्यालयातील काही अधिकारी किंवा सल्लागार अतिशय अपरिपक्व असल्यामुळे अशाप्रकराचं पत्र गेलं आहे. अशाप्रकारचं पत्र पाठवण्याऐवजी राज्यातील पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले असते, तर ते अधिक संवेदनशील दिसलं असतं. या प्रकाराला अशाप्रकारे राजकीय रंग देणं योग्य नाही. हे तर अपरिपक्वतेचं परिचायक आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.