स्रोत: रत्नागिरी खबरदार
मुंबई : भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप कागदपत्रे दाखवून केला होता. त्यानंतर नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधांचा हायड्रोजन बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला. दरम्यान, मलिक यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांच्यावर अनेक आरोप केले. त्यामध्ये, नोटीबंदीच्या काळात साडे १४ कोटींच्या बनावट नोटा सापडल्याचे प्रकरण फडणवीस यांनी दाबल्याचा आरोप मलिक यांनी केला. आता, फडणवीस यांनी मलिकांच्या आरोपाला एका वाक्यात उत्तर दिलं आहे.
मलिक यांनी केलेल्या आरोपाला आणि फोडलेल्या हायड्रोजन बॉम्बला फडणवीसांनी एका ट्विटने उत्तर दिलंय.
Thought of the day 👇🏼 pic.twitter.com/PkLiHS3GVW
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 10, 2021
त्यामध्ये, डुकराचा उल्लेख केला असून डुकराशी कुस्ती खेळू नये, असेही त्यांनी म्हटलंय.खूप पूर्वीच एक गोष्ट शिकलोय, डुकराशी कधीही कुस्ती करू नका. कारण, तुम्ही गलिच्छ व्हाल आणि डुकराला तेच आवडेल, अशा आशयाचे ट्विट फडणवीस यांनी केले आहे. फडणवीस यांनी कुणाचेही नाव घेतले नाही, पण नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर फडणवीसांनी हे ट्विट केलंय. त्यामुळे, त्यांच्या या ट्विटचा टोला स्पष्टपणे नवाब मलिक यांच्याकडेच इशारा करत असल्याचे दिसून येते.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.