मुंबई : उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांची तशी इच्छा नव्हती. भाजपा आणि शिवसेनेत सत्तेतील अडीज-अडीज वर्षांचा वाटा ठरला होता, परंतू त्यांच्यात एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे जे व्हायला नको होते, ते झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तेत आली. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत. मित्र म्हणून अत्यंत साधाभोळा माणूस आहे, अशी स्तुतीसुमने केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर उधळली. परंतू त्यांनी एक सल्लाही दिला.
राज्यातील राजकारणावर बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांना काही सल्ले दिले. तसेच आपल्याला आरपीआय स्वत:च्या हिंमतीवर आमदार, खासदार निवडून येतील असा उभारता आला नाही. यामुळे अनेकांना न्याय देता आला नाही, असे सांगत कार्यकर्त्यांची माफीदेखील मागितली आहे. ज्या समाजासाठी मी लढलो, त्याच आपल्या लोकांनी माझ्यावर ठिकठिकाणी हल्ले केले. याचे मला आयुष्यभर वाईट वाटत राहील असे आठवलेंनी सांगितले. याचबरोबर उद्धव ठाकरेंना सल्ला देताना त्यांनी महायुतीत यावे, आणि फडणवीसांचे गीत गावे.
फडणवीसांनी एक दिवस मातोश्रीवर जावे, आणि उद्धवजींना घेऊन यावे, अशी कविता केली. गो कोरोनासारखी माझी हाक ‘कम उद्धवजी’ अशी असेल, असेही त्यांनी सांगितले. तसेच देवेंद्र फडणवीसांना सल्ला देताना उद्धव ठाकरेंसोबत जुळवून घ्यावे, 2.5 वर्षे त्यांना द्यावे, अडीज आपण घ्यावे, असा सल्ला दिला.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.