मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्याच्या निर्णयानंतर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्ष असलेल्या भाजपने जोरदार टीका केली होती. त्याच बरोबर लॉकडाऊन काहीळ मंदिरं बंद आणि दारुची दुकानं सुरु ठेवण्याच्या निर्णयावरुन ही भाजप नेत्यांनी ठाकरे सरकार विरोधात जोरदार टीका केली होती.
त्यानंतर आता ठाकरे सरकारनं राज्यातील किराणा आणि रेशन दुकानांना वाईन विक्रीसाठी परवानी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर आता भाजप नेते अधिक आक्रमक झाले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही तर महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराच ठाकरे सरकारला दिला आहे.