प्रसिद्ध बॉलीवू़ड रॅपर हनी सिंग सध्या कौटुंबिक प्रकारणामुळे चर्चेत आला आहे.हनी सिंग च्या विरोधात त्याची पत्नी शालिनी तलवारने तक्रार दाखल केली होती.कौटुंबिक हिंसाचारामुळे महिला संरक्षण कायद्यांतर्गत हनी सिंगवर तक्रार दाखल केली होती.पत्नीच्या आरोपानंतर रॅपर हनी सिंगने आता स्पष्टीकरण दिले आहे.

शालिनीने तक्रारीमध्ये हनी सिंगवर काही गंभीर आरोप केले. हनी सिंगने मानसिक छळाबरोबर आपला शारीरिक छळ केल्याचा आरोपही तिने केला आहे. शालिनीने हनी सिंगबरोबरच त्याच्या आई-वडिलांवर देखील आरोप केले.मात्र हे सर्व आरोप हनी सिंगने फेटाळून लावले आहेत. हनी सिंगने अखेर मौन सोडून त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शालिनीने केलेले सगळे आरोप खोटे असल्याचे हनी सिंगने म्हटले आहे. “२० वर्षापासून शालिनी तलवार माझी पत्नी आहे. त्याच शालिनीने माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर लावलेले सगळे आरोप हे खोटे आहेत. हे सगळे आरोप ऐकून मला दु:ख झालं आहे”, असं हनी सिंगनं म्हटलं आहे.

भूतकाळात माझ्या गाण्यांवर आणि माझ्या आरोग्याविषयी अनेक नकारात्मक गोष्टींवरून माझ्यावर टीका करण्यात आल्या, तरी मी कधीही प्रेस नोट किंवा कोणतीही पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, यावेळी शांत राहून काही होणार नाही असं मला वाटलं, कारण यावेळी माझ्या वृद्ध पालकांवर आणि धाकट्या बहिणीवर…जे माझ्या वाईट परिस्थितीत माझ्यासोबत होते त्यांच्यावर आरोप केले आहेत. हे सगळे आरोप बदनाम करणारे आहेत,” असे देखील हनी सिंगने म्हटलं आहे.
पुढे हनी सिंग म्हणाला, “मी गेल्या १५ वर्षांपासून या इंडस्ट्रीत आहे आणि देशभरातील कलाकार आणि संगीतकारांसोबत काम केले आहे. माझ्या टीममध्ये गेल्या १० वर्षांपासून जे लोक आहेत, त्यांना माझे आणि माझ्या पत्नीचे संबंध कसे आहेत याबद्दल माहिती आहे. ती प्रत्येक चित्रीकरणाला, कार्यक्रमाला आणि मीटिंगमध्ये सोबत असते. या सगळ्या आरोपांचे मी खंडन करतो पण मी यावर काही बोलणार नाही कारण हे प्रकरण न्यायालयात आहे. या देशाच्या न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मला विश्वास आहे की सत्य लवकरच समोर येईल.”अस म्हणत हनी सिंगने या प्रकरणावर मौन सोडलं आहे.
Credits and Copyrights – lokshahinews.com