इन्स्टाग्राम आपल्या स्टोरीजमध्ये दोन मोठे बदल घेऊन येणार आहे. आता या अॅपमधून स्वाइप-अप लिंक फिचर बंद करण्यात येणार आहे. या फिचरची जागा नवीन लिंक स्टीकर फिचरला देण्यात येणार आहे, तसेच अजून एक फिचर येत आहे, ज्यामध्ये इन्स्टाग्राम युजर्स आता स्टोरीज लाईक करू शकतील. हे बदल ३० ऑगस्टनंतर इन्स्टाग्राम अॅपमध्ये दिसू शकतात.
हे नवीन फिचर सर्व प्रथम उपलब्ध
इन्स्टाग्रामवर आतापर्यंत १०,००० पेक्षा जास्त फॉलोअर्स असणाऱ्या अकाऊंट्सना इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये लिंक शेअर करता येत होत्या. या स्वाइप-अप नावाच्या फिचरच्या माध्यमामधून इन्स्टाग्राम सेलिब्रिटी अथवा क्रियेटर्स अॅप बाहेरील वेबपेजवर फॉलोअर्सना फॉलो डायरेक्ट करू शकत होते. आता हे फिचर अॅपमधूनच काढून टाकण्यात येणार आहे, ३० ऑगस्टपासून हा बदल लागू होईल, अशी माहिती टेकक्रंचने दिली आहे. इन्स्टाग्रामवरील स्वाइप-अप लिंक फिचरच्या जागी आता नवीन लिंक स्टीकर फिचर येणार आहे. जे युजर याआधी स्वाइप-अप फिचर वापरत होते, त्यांना हे नवीन फिचर सर्व प्रथम उपलब्ध होईल. सध्या टेस्टिंगमध्ये असलेले हे फिचर पुढच्या महिन्यामध्ये सर्व पात्र अकाऊंट्सकरिता उपलब्ध होईल. तसेच हे फिचर सर्व युजर्सकरिता उपलब्ध करवून देण्यावरदेखील इन्स्टाग्राम काम करत असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र हा निर्णय अॅप सुरक्षितता, लिंकच्या माध्यमातून होणाऱ्या खोट्या माहितीचा प्रसार, स्पॅमिंग इत्यादी घटक लक्षात ठेऊन घेतला जाईल.
लवकरच इन्स्टाग्राम स्टोरीज लाईक बटन
इन्स्टाग्राम स्टोरीजकरितादेखील लाईक बटन सादर करणार आहे. सध्या युजर्स स्टोरीजवर रिअॅक्ट करू शकतात, तसेच रिप्लाय देऊ शकतात. मात्र लवकरच इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये लाईक बटनदेखील दिसण्याची शक्यता आहे. पोस्ट करणाऱ्या युजरला किती लाईक्स मिळाल्या आहेत हे बघता येईल. हे फिचर अजून बीटा टेस्टर्सकरिता देखील उपलब्ध झाले नाही, परंतु प्रसिद्ध डेव्हलपर अलेस्सांड्रो पलुझी यांनी प्लॅटफॉर्म लवकरच उपलब्ध होईल असे सांगितले आहे.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.