पुणे : कोरोनाची तिसरी लाट निर्माण होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधी पक्षांसह राजकीय पक्षांना गर्दीचे राजकीय कार्यक्रम न घेण्याचे आवाहन करीत आहेत. परंतु आमदार रोहित पवार हे मुख्यमंत्र्यांचे ऐकत नाहीत तसेच आजोबांचेही ऐकत नाहीत त्यामुळे आमदार रोहित पवार यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख रवि सुरवसे, पंचायत समिती सदस्य डॉक्टर भगवान मुरूमकर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.