मुंबई : मंत्री अनिल परब यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. लोकायुक्त सुनावणीत आता हे सिद्ध झालं आहे की, ठाकरे सरकारचे मंत्री अनिल परब यांनी फसवणूक, फॉर्जरी करून रत्नागिरी दापोली येथील समुद्र तटावर 17800 स्क्वेअर फूटाचे पंच तारांकित रिसॉर्ट बांधलं असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. या आरोपानंतरच अनिल परबांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे. या संदर्भात लोकायुक्त, राज्यपाल, राष्ट्रीय हरीत लवादा, दापोली पोलीस स्टेशन, पर्यावरण मंत्रालय केंद्र सरकार अशा विभिन्न विभागात तक्रारी याचिका करण्यात आल्या होत्या. मग मग अनिल परब यांच्यावर कारवाई कधी होणार? असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
किरीट सोमय्या बोलताना म्हणाले की, “लोकायुक्त यांच्याकडे झालेल्या सुनावणीत महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने अॅफिडेवीट सुपूर्द केले. त्यात अनिल परब यांच्या या रिसॉर्टचा बिनशेती परवाना रद्द करण्यात आल्याचा उल्लेख आहे. दोन चौकशींमध्ये हे सुद्धा आढळून आलं की, नगर रचना विभागानं सदर जागेवर कोणतेही बांधकाम करता येणार नाही, असं स्पष्ट पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलं होतं. ते पत्र अनिल परब यांचे मित्र सहकारी अधिकारी यांनी महसूल/ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फाईलमधून गायब केले होते.” “अनिल परब यांनी फसवणूक, फॉर्जरी, लबाडी करून हा रिसॉर्ट बांधला.
मंत्री असताना रिसॉर्टचे बांधकाम पूर्ण केले आणि स्वतःच्या खात्यातून पैसे दिले. ठाकरे सरकार अनिल परब यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सोमवार दिनांक 13 डिसेंबर रोजी मी दापोली पोलीस स्टेशन येथे या तक्रारीचा पाठपुरावा आणि FIR दाखल करणार आहे. अनिल परब यांच्या फसवणूक, फोर्जरीच्या विरोधात कार्यवाही करण्यासाठी दापोली येथे जाणार आहेत.”, असं किरीट सोमय्या म्हणाले.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.