रस्ते हे विकासाची नाडी असतात. ग्रामीण भागातील रस्ते विकासाकरिता अत्यंत उत्तम स्थितीत असणे अत्यावश्यक आहे, परंतु नेमके या बाजूने विचार न करता त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. रस्त्यांच्या जर्जर अवस्थेमुळे वाहतूक करताना हाल होत असल्यामुळे रस्त्यांची स्थिती सुधारावी, अशी प्रशासनाकडे मागणी करण्यात येत होती. महाड एसटी स्टँड ते महामार्गाला जोडणारा रस्ता हा कायम चर्चेचा विषय राहिला आहे. आत्ताच नवीन तात्पुरत्या स्वरूपाच्या रस्त्याची तर अत्यंत दयनीय अवस्था आहे.
महाड एसटी स्टँड ते महामार्गाला जोडणारा रस्ता सध्याची स्तिथी “तोंड दाबून बुक्क्यांचा मार” अशी अवस्था झाली होती. त्यामुळे शहरातील नागरिक सहन करत आहेत. नागरिकांचे हे हाल तातडीने थांबवावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री. चेतन उतेकर यांनी सातत्याने विचारणा केली.
याची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री. चेतन उतेकर यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी एसटी डेपो अधिकारी, त्याचप्रमाणे नगरपालिका यांच्याशी पाठपुरवठा केला होता. सदर रस्त्याचे काम त्वरित केले नाही, तर आंदोलनाचा इशाराही दिला होता. याचीच दखल घेत नगरपालिकेकडून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम त्वरित सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे महाडकर नागरिक अत्यंत समाधान व्यक्त करत आहेत.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.