गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावरील लोकप्रिय, तितकाच वादग्रस्त शो ‘बिग बॉस’ची चर्चा तुफान रंगताना दिसत आहे. ‘बिग बॉसचा १५ वा सीजन लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यंदा बिग बॉस ने आपले माध्यम बदले आहे. हा शो पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यानंतर हा शो टीव्हीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.या नवीन सीझनचा पहीला टीझर रिलीज झाला आहे.
‘बिग बॉस’ ओटीटीचं सुत्रसंचालन प्रसिद्ध निर्माता करण जोहर करणार आहे.सोशल मिडीयावर त्याचा टीझर प्रदर्शित केला आहे.या शोमध्ये करण खुप मज्जा मस्ती करताना दिसत आहे.
‘बिग बॉस’चा हा सीजन पहिले काही आठवडे ओटीटी प्लॅटफॉर्म वूट वर प्रदर्शित होणार आहे. ज्याचे सूत्रसंचालन करण जोहर करताना दिसेल. नंतर टीव्हीवर याचे सूत्रसंचालन सलमान खान करणार आहे. या शोच शुटिंग सुरू झाले असून सध्या स्पर्धक बिग बॉसच्या घरात जाण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे. ओटीटीवर हा शो येत्या ८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
Credits and Copyrights – lokshahinews.com