मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली आहे. पण देशमुख कुटुंबियांच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत. ईडीनं अनिल देशमुखांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर आता त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख ईडी च्या रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे. अनिल देशमुखांचे सर्व पैशांचे व्यावहार मुलगा ऋषिकेश पाहात असल्याचं तपासात उघड झालं आहे, त्यामुळं ईडीनं ऋषिकेश देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे.
ईडी नं गुरुवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना समन्स बजावत शुक्रवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. अशातच ऋषिकेश देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी उपस्थित राहणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना चार दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांची दिवाळी कोठडीत जाणार आहे. मंगळवारी, पहाटेच्या सुमारास अनिल देशमुख यांना 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटक केली. ईडीने विशेष कोर्टाकडे 14 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, कोर्टाने 6 नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.