राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे अज्ञातवास आहेत. त्यांचा ठावठिकाणा माहित नाही, असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. ईडीतील सुत्रांनी अनिल देशमुख संपर्कात नसल्याचं सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी देखील अनिल देशमुख नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे अनिल देशमुख नेमके कुठे आहेत? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आरोप केले आहेत. या आरोपांची सीबीआय आणि ईडी चौकशी करत आहे. ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी चारवेळा समन्स बजावलं. मात्र, एकदाही अनिल देशमुख चौकशीला उपस्थित राहिले नाहीत. दरम्यान, एएनआयला ईडीने अनिल देशमुख संपर्कात नसल्याचं सांगितलं. “आमचा अनिल देशमुख यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ते कुठे आहेत हे आम्हाला माहित नाही. त्यांचं नेमकं ठिकाण माहीत नाही. आम्ही आज सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत आहोत. आम्हाला आशा आहे की आजच्या आदेशानंतर ते तपासाला सहकार्य करतील,” असं वृत्त आहे.
दरम्यान, आज अनिल देशमुख यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. अंतरिम दिलासा मिळावा यासाठी अनिल देशमुख यांनी याचिका दाखल केली होती. दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालय काय उत्तर देतं याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.
Credits and. Copyrights – ratnagirikhabardar.com