क्रिकेटचा मोठा चाहता वर्ग असणारा भारत देश खेळाप्रती आपली आवडबदलताना आपलाल्या देशात आहे. टोकियो ऑलम्पिकमध्ये त्याची प्रचीती आली. आता अजून एका खेळासाठी भारत तयार झाला आहे. तो खेळ आहे फॉर्म्युला 4 इंडियन चॅम्पियनशिप. ही स्पर्धा यावर्षी हैदराबाद येथे आयोजित करण्यात आली आहे.
तेलंगणाचे आयटी उद्योग मंत्री आणि महापालिका प्रशासन, उद्योग आणि वाणिज्य मंत्री कलवकुंतला तारका रामा राव (Kalvakuntla Taraka Rama Rao) आणि दक्षिण भारतीय अभिनेता विशाल (Actor Vishal) यांच्यासह रविवारी हैदराबादच्या माधापूर येथे ‘फॉर्म्युला रिजनल इंडियन चॅम्पियनशिप आणि फॉर्म्युला 4 इंडियन चॅम्पियनशिप’ चे उद्घाटन होत आहे. हैदराबाद येथे होणारी जागतिक दर्जाची एफआयए ग्रेड स्ट्रीट सर्किट फेब्रुवारी 2022 मध्ये चार शहरांमध्ये होणार आहे.
हैदराबाद शहर पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी F3 स्ट्रीट सर्किट शर्यतीला हिरवा झेंडा दाखवला. ही स्पर्धा शहरातील आयकॉनिक केबल पुलापासून सुरू करण्यात आली आणि कार्यक्रमस्थळी संपली. रेसिंग प्रमोशनच्या सध्याच्या प्रयत्नांविषयी बोलताना रेसिंग प्रमोशनचे अध्यक्ष अखिलेश रेड्डी म्हणाले की, “मोनॅको एक सार्वभौम शहर-राज्य असल्याने तिथे एफ 1 ड्रायव्हर्स तयार झाले आहेत आणि आपल्याकडे एक अब्जाहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशात अनेक इच्छुक रेसिंग ड्रायव्हर्सना संधी देण्यासाठी हे व्यासपीठ आहे.
This post has been created via RSS feed. No copyright is held by us. If it is your content contact us and let us know we will Give proper credits. Or we will take it down.