कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या १६ महिन्यांपासून नाट्यगृह आणि सिनेमागृह बंद आहेत.राज्यसरकारने १५ ऑगस्टपासून बहुतांश निर्बंध उठवले आहेत.राज्यासरकारच्या या निर्णयामुळे जनता आणि व्यापारी यांना दिलासा मिळाला आहे.मात्र राज्यातील नाट्यगृह आणि सिनेमागृह बंद आहेत.त्यामुळे अनेक कलाकार सिनेमागृह आणि नाट्यगृह उघडण्यासाठी आग्रही आहेत. राज्यातील सिनेमागृह बंद असण्यामुळे वरूण धवनने त्याची नाराजी व्यक्त केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे.

मुंबईत आता करोना निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. नियम पाळून लोक सगळीकडे जाऊ शकतात. एवढच नाही तर ज्यांचे लसीकरणाचे दोन डोस झाले आहेत त्यांना आता शॉपिंग मॉलमध्ये जाण्याची परवानगी आहे. मात्र या यादीत अजून चित्रपटगृहांना परवानगी देण्यात आली नाही. वरूणने महाराष्ट्रातील चित्रपटगृह बंद ठेवण्याच्या आदेशाबद्दल त्याचे मत व्यक्त करत गुरुवारी त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत गाड्यांची वर्दळ आणि गर्दी दिसत आहे. या व्हिडीतून सर्व काही सुरळीत सुरु असल्याचं पाहायला मिळतंय.हा व्हिडीओ त्याच्या स्टोरीवर शेअर करत त्याने लिहिले की, “सगळं काही सुरू आहे, मात्र चित्रपटगृह बंद” याबरोबरच त्याने नाराजी व्यक्त करणार इमोजी देखील वापरला.
ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या नवीन नियमावलीत शॉपिंग मॉल, जिम सारख्या बऱ्याच गोष्टीवरचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. इतर राज्यात ३० जुलै पासून मल्टीप्लेक्स, आणि पीव्हीआर सिनेमासाठी ज्यांचे लसीकरण झाले आहे त्यांना परवानगी दिली आहे.
Credits and Copyrights – lokshahinews.com